बीडच्या तरुणाचा ऑफिसबॉय ते ग्राफिक्स सॉफ्टवेअर डिझायनर असा प्रेरणादायी प्रवास...

बीड | कठोर आत्मविश्वास आणि जिद्द काय असते, हे दाखवून दिलंय बीडच्या आष्टी गावातील दादासाहेब भगत या ध्येयनिष्ठ तरुणाने. या तरुणाने गावात पत्राच्या शेडमध्येच सॉफ्टवेअर कंपनी थाटली आहे. गावातच दादासाहेब यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी आयटीआय केला. काही कारणास्तव त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर दादासाहेब यांनी पुणे गाठलं. हाताला काही काम नव्हतं, त्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता.

बीडच्या तरुणाचा ऑफिसबॉय ते ग्राफिक्स सॉफ्टवेअर डिझायनर असा प्रेरणादायी प्रवास...

काही दिवसातच त्याला इन्फोसिसमध्ये ऑफिसबॉयची नोकरी मिळाली. तिथे नोकरी करत असताना काहीतरी वेगळं करावं, असं त्याला वाटायला लागलं. मग त्याने अ‌ॅनिमेशन आणि मोशन ग्राफिक्सबद्दल माहिती घेऊन ऑनलाईन शिकायला चालू केले. त्यानंतर काही महिन्यातच त्याने स्वतःची कंपनी चालू केली. कामाच्या जोरावर कंपनीचा चांगला जम बसवला. पण काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी झाली. याचा त्याला चांगलाच फटका बसला. पण तरीही त्याने हार मानली नाही. त्यानंतर तो आपल्या गावी परतला.

भारतात असे अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना ग्राफिक्स डिझायनिंगमध्ये आवड आहे. पण सर्व सॉफ्टवेअर हे परदेशी असल्यामुळे शिकण्यास खूपच अवघड आहे, हीच अडचण दूर करण्यासाठी दादासाहेब यांनी भारतीय बनावटीच ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवण्याचा निर्णय घेतला. गावात मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये ७ पुण्याच्या मित्रांना सोबत घेऊन काम चालू केलं. मित्र म्हणाले, आम्हाला सध्या फक्त खर्चाला पैसे दे. सॉफ्टवेअर लाँच झाल्यावर पैशाच काय ते बघू.

अथक प्रयत्नानंतर स्वातंत्र्यदिनी Do Graphics नावाच सॉफ्टवेअर बाजारात आणल आहे. गुगलवर doographics.com या संकेतस्थळावरून सर्वांना ते वापरता येईल. या स्टार्टअपसाठी जर कोणाला मदत करायची असेल तर तो पर्याय त्याने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. फक्त जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असल्यावर त्याच्याआड कोणतंही कारण येत नाही, हे यातून स्पष्ट झालय. अशी कामाची तळमळ पाहिली की भविष्यातील भारत हा नक्कीच उज्ज्वल असेल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.

like
3
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
2